नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना आणि श्रद्धेचा उत्सव असतो. पांडे नावाच्या वाई तालुक्यातील गावात उभी नवरात्र ही परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. नवरात्रमध्ये जे लोक नवस बोलतात, ते नवसकरी घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत उभे राहून नवस पूर्ण करतात. या अनोख्या उपवासाने “सर्व मनोकामना पूर्ण होतात” अशी या गावातील, तसेच परिसरातील लोकांची धारणा आहे. यावर्षीही नऊ दिवस उभे राहून काळभैरवनाचा जागर गावात करण्यात आला आहे. या परंपरेला अनुसरून जे चालतं त्यात, 9 दिवस जमिनीवर बसायचं नाही; ही कडक गोष्ट पाळावी लागते. मग ती पाळत असताना उपवास धरणारे लोक ही उभी राहूनचं आपली झोप पुर्ण करतात. खरतरं या अनोख्या गोष्टीमुळेच येथील नवरात्रीला “उभ्याची नवरात्र” या नावाने संबोधलं जांत. सध्याच्या घडीला देशभरात शारदीय नवरात्र उत्सव हा जोरदार सुरू आहे. नवरात्रीत, पहिले घटस्थापना करत देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्रातचं नव्हे तर देशभरात सार्वजनिक ठिकाणीही देवीच्या विविध रुपांची स्थापना करण्यात येते. या स्थापनेनंतर नऊ दिवस अनेक भक्त उपवास सुरू करतात. हे उपवास करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. काहींचा उपवास हा नऊ दिवसांचा असतो मात्र काही जण रोज एक वेळ जेवून उपवास धरतात. तर काही व्यक्ती केवळ उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. त्यातचं अनेकजण चप्पल न घालण्याचा तर काही मंडळी इतर वस्तुंचाही नऊ दिवस त्याग करतात. अर्थातचं ज्याला जसं जमेल तशी तो मनोभावे देवीची पूजा-अर्चना करत राहतो.

साताऱ्यातील पांडे हे बारा बलुतेदारांचं गाव आहे. दरवर्षी या गावातील 350 ते 400 लोक देवीचा उपवास करतात. हा उपवास करताना हातात काठी घेऊन गावभर आरती केली जाते. या नवरात्रीत हिंदूंसोबतचं गावातील मुस्लीम समाजही यात चांगल्या प्रमाणात सहभागी होताना पहायला मिळतो. या उपवासात तेल, मीठ, तिखट पूर्णपणे टाळलं जातं. ते फक्त गोड पदार्थ, फळं आणि दूध घेतात. खास बाब म्हणजे, संपूर्ण नऊ दिवस ते बसत नाहीत. आधार फक्त काठीचा. झोपेसाठी ते झोपाळ्यावर छाती टेकवून, एक पाय वर घेऊन उभ्यानेचं झोपतात. येथील गावकऱ्यांचा विश्वास आहे की, जितकी सेवा कठीण तितकं फळ मोठं मिळतं. या भक्ती, त्याग आणि श्रद्धेच्या परंपरेमुळे दरवर्षी हजारो लोक पांडे गावात देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात. आपल्या मनातून इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस केला जातो. तर मंडळी सातारा जिल्ह्यातील या उभ्या नवरात्री विषयी तुम्हाला काही माहिती होती का? तुमच्याकडे अशी कोणती अनोखी प्रथा चालते का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. उपास, जागरण, आरत्या आणि भजनांनी वातावरण भक्तिमय होतं. स्त्रीशक्ती, संयम आणि भक्तीचा संदेश यातून दिला जातो. ही नऊ दिवसांची साधना म्हणजे श्रद्धा, त्याग आणि आशेचं प्रतीक असतं. नवरात्रीच्या विविध आराधना आपणं पाहतोचं पण सध्या सातारा जिल्ह्यातील एक अनोखी प्रथा समोर आलेली पहायला मिळाली आहे. ही प्रथा ९ दिवस उभी राहण्याची आहे. म्हणजे नेमकं काय याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पांडे नावाच्या वाई तालुक्यातील गावात उभी नवरात्र ही परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. नवरात्रमध्ये जे लोक नवस बोलतात, ते नवसकरी घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत उभे राहून नवस पूर्ण करतात. या अनोख्या उपवासाने “सर्व मनोकामना पूर्ण होतात” अशी या गावातील, तसेच परिसरातील लोकांची धारणा आहे. यावर्षीही नऊ दिवस उभे राहून काळभैरवनाचा जागर गावात करण्यात आला आहे. या परंपरेला अनुसरून जे चालतं त्यात, 9 दिवस जमिनीवर बसायचं नाही; ही कडक गोष्ट पाळावी लागते. मग ती पाळत असताना उपवास धरणारे लोक ही उभी राहूनचं आपली झोप पुर्ण करतात. खरतरं या अनोख्या गोष्टीमुळेच येथील नवरात्रीला “उभ्याची नवरात्र” या नावाने संबोधलं जांत. सध्याच्या घडीला देशभरात शारदीय नवरात्र उत्सव हा जोरदार सुरू आहे. नवरात्रीत, पहिले घटस्थापना करत देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्रातचं नव्हे तर देशभरात सार्वजनिक ठिकाणीही देवीच्या विविध रुपांची स्थापना करण्यात येते. या स्थापनेनंतर नऊ दिवस अनेक भक्त उपवास सुरू करतात. हे उपवास करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. काहींचा उपवास हा नऊ दिवसांचा असतो मात्र काही जण रोज एक वेळ जेवून उपवास धरतात. तर काही व्यक्ती केवळ उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. त्यातचं अनेकजण चप्पल न घालण्याचा तर काही मंडळी इतर वस्तुंचाही नऊ दिवस त्याग करतात. अर्थातचं ज्याला जसं जमेल तशी तो मनोभावे देवीची पूजा-अर्चना करत राहतो. तर मंडळी सातारा जिल्ह्यातील या उभ्या नवरात्री विषयी तुम्हाला काही माहिती होती का? तुमच्याकडे अशी कोणती अनोखी प्रथा चालते का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.


