जम्मू-काश्मीर, २२ एप्रिल २०२५
हसतमुख चेहऱ्यांवर थांबलेले क्षण, कॅमेऱ्यात कैद झालेलं निसर्गसौंदर्य… आणि त्याच क्षणी आकाशात उमटलेले गोळ्यांचे आवाज. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने आज अनेक कुटुंबांची आयुष्यं उध्वस्त केली. या हल्ल्यात २० हून अधिक निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. हृदयद्रावक बाब म्हणजे, या मृतांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश असून, त्यातील दोन जण हे पुण्यातील आहेत.
या भ्याड हल्ल्याने केवळ लोकांचा जीव घेतला नाही, तर देशाच्या आत्म्यालाच घाव दिला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून शांतता आणि सौंदर्य अनुभवायला आलेल्या पर्यटकांना मृत्यूच्या सावलीत ढकलणाऱ्या या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. जखमींच्यावर उपचार सुरू असून, प्रशासनाकडून त्यांच्या सुखरूपतेसाठी प्रयत्न सुरु आहेत. तपास यंत्रणा सतर्क असून, या हल्ल्यामागील सूत्रधार शोधण्यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.हशतवादाच्या या सावटाने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे — किती काळ अशी निर्दोष माणसं बळी पडणार? हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमींना लवकर बरे वाटो, हीच प्रार्थना.



