पुणे : पुण्यनगरीचा अभिमान ठरलेली ऋतुजा वऱ्हाडे हिने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) परीक्षेत देशभरात मुलींमध्ये अव्वल क्रमांक पटकावला असून, ऑल इंडिया रँकमध्ये तिने ३ रा क्रमांक मिळवला आहे. देशभरातील सुमारे दीड लाख मुलींनी ही परीक्षा दिली होती. अशा स्पर्धात्मक वातावरणात ऋतुजाने दाखवलेली जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास खरोखरच प्रेरणादायी आहे. पुण्याच्या या गुणवंत लेकीच्या यशाचा समस्त पुणेकरांना अभिमान आहे. ऋतुजाचे मनःपूर्वक अभिनंदन करत, तिच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!



