भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी यंदा मर्यादित पगारवाढ जाहीर केली आहे. TCS आणि Infosys या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना यंदा कमी पगारवाढ मिळणार असून, बोनस कपातीमुळे वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे.
TCS आणि Infosys – किती टक्के पगारवाढ?
TCSच्या कर्मचाऱ्यांना 4 ते 8 टक्के पगारवाढ मिळेल, तर Infosysच्या कर्मचाऱ्यांना 5 ते 8 टक्के वाढ दिली जाईल. ही पगारवाढ गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
व्हेरिएबल पे आणि बोनसवर परिणाम
टीसीएसच्या कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना यंदा 100% व्हेरिएबल पे मिळणार आहे. मात्र, वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना फक्त 20 ते 40% बोनस मिळू शकतो. यामुळे उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
आयटी क्षेत्र संकटात?
गेल्या काही महिन्यांत आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम कंपन्यांच्या महसुलावर झाला असून, Infosysने म्हैसूर कॅम्पसमधून 3000 पेक्षा अधिक फ्रेशर्सना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार?
कमी पगारवाढ आणि बोनस कपातीमुळे कर्मचाऱ्यांचे बचतीचे आणि गुंतवणुकीचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. तसेच, बाजारातील मंदी लक्षात घेता येत्या काही महिन्यांत कंपन्या आणखी कठोर निर्णय घेऊ शकतात.
IT क्षेत्रातील बदलत्या धोरणांवर कर्मचारी आणि गुंतवणूकदार सतत लक्ष ठेवून आहेत. आगामी काळात आयटी कंपन्यांकडून कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.



