topkhabar24.in
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स
No Result
View All Result
Thursday, March 26, 2026
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स
No Result
View All Result
topkhabar24.in
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
  • स्पोर्ट्स
Home टॉप खबर

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई! मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा

Top Khabar24 by Top Khabar24
March 5, 2025
in टॉप खबर
0 0
0
dhananjay munde rajinama
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावात झालेल्या संतोष देशमुख हत्याकांडानंतर आता मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप होत होता. त्यामुळेच सरकारवर वाढत्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्रीच मुंडेंना मंत्रिपद सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज विधानसभेच्या कामकाजाच्या आधीच त्यांनी आपल्या पीए प्रशांत जोशी यांच्यामार्फत राजीनामा सुपूर्त केला. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

You might also like

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

गृहराज्यमंत्री योगेश कदम वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीत, राज्य सुरक्षित आहे का?

समर्थ शेलारची दुहेरी झेप विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश देताच राजीनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर काल रात्री महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना थेट राजीनामा देण्यास सांगितले.

या बैठकीनंतर लगेचच राजीनामा लिहून घेण्यात आला आणि आज सकाळी तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करण्यात आला.

वाल्मिक कराडच्या अटकेनंतर वाढला दबाव

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा सहकारी आणि समर्थक असल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात आले होते. कराड हा मुंडेंच्या निवडणुकीतील प्रमुख रणनीतीकार होता, तसेच त्याला राजकीय अभय मिळाल्याने तो कायद्याच्या कचाट्यातून बचावत राहिला, असे आरोप होत होते.

या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी वाढत होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय घेतला आणि राजीनामा घेतला.

पुढील राजकीय समीकरणांकडे लक्ष

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी अधिक तीव्र होईल का, यावर चर्चा सुरू आहे. तसेच, या घटनेचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता सरकार पुढील कारवाई कशी करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags: धनंजय मुंडेराजकारणराजीनामावाल्मिक कराडसंतोष देशमुख

Related Posts

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?
राजकारण

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

October 11, 2025
गृहराज्यमंत्री योगेश कदम वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीत, राज्य सुरक्षित आहे का?
राजकारण

गृहराज्यमंत्री योगेश कदम वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीत, राज्य सुरक्षित आहे का?

October 9, 2025
समर्थ शेलारची दुहेरी झेप विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
शिक्षण

समर्थ शेलारची दुहेरी झेप विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

October 1, 2025
टॉप खबर

मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, मराठवाड्यातील पुराने केलेल्या नुकसानाने काय गमावलं?

September 25, 2025
शिक्षण

“मुळशीतील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड 2025’चा मान”

August 14, 2025
“स्वराज्याच्या साक्षीला चला रायगड – शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दोन दिवसीय आयोजन”
टॉप खबर

“स्वराज्याच्या साक्षीला चला रायगड – शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दोन दिवसीय आयोजन”

June 3, 2025
Next Post

मार्च महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा महापूर! ‘डेअरडेव्हिल: बॉर्न अगेन’, ‘टू व्हीलर’, ‘नादानियां’ आणि इतर जबरदस्त रिलीज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

Tu Guía de Introducción a SpinRain Casino: Lo Básico para Empezar

March 25, 2026

Bonuskong Casino o Slot Gratis Quale Scegliere per Vincere

March 25, 2026

FoxSlots Casino: Der Mythos vom garantierten Gewinn – Was wirklich zählt

March 23, 2026
BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

October 11, 2025

Calendar

March 2026
MTWTFSS
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031 
« Oct    

Categories

  • Uncategorized (8)
  • आंतरराष्ट्रीय (3)
  • चित्रपट (1)
  • टॉप खबर (22)
  • निवडक बातमी (2)
  • ब्लॉग (1)
  • मनोरंजन (4)
  • राजकारण (18)
  • राष्ट्रीय (1)
  • विज्ञान-तंत्रज्ञान (1)
  • शिक्षण (2)
  • स्पोर्ट्स (5)
topkhabar24.in

© 2024-2025 Top Khabar24. All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स

© 2024-2025 Top Khabar24. All Rights Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In