तंत्रज्ञान आणि बदलत्या जीवनशैलीसोबत, प्रत्येक दशकानुसार नव्या पिढ्यांची व्याख्या होत आहे. 1996 ते 2010 दरम्यान जन्मलेली मुलं Gen Z म्हणून ओळखली जातात, तर 2010 नंतर जन्मलेली मुलं Gen Alpha या नावाने प्रसिद्ध आहेत. मात्र, 2025 नंतर जन्मणारी पिढी एका वेगळ्या नावाने ओळखली जाणार आहे – ‘जनरेशन बीटा’ (Gen Beta).
Gen Beta म्हणजे काय?
Gen Beta ही पिढी Gen Alpha चा पुढचा टप्पा मानली जाते. 2025 ते 2039 दरम्यान जन्मलेली मुलं या गटात येतील. तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), हवामान बदल, आणि आधुनिक शहरीकरणाच्या प्रभावाखाली वाढणारी ही पिढी असेल.
Gen Beta बद्दल महत्त्वाच्या गोष्टी:
- डिजिटल नेटिव्ह पिढी:
Gen Beta ही आतापर्यंतची सर्वात डिजिटलली नेटिव्ह पिढी मानली जाते. स्मार्ट उपकरणं आणि AI या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनतील. - पर्यावरणाविषयी जागरूकता:
मॅकक्रिंडलच्या संशोधनानुसार, ही पिढी पर्यावरणासंबंधित समस्यांबद्दल अधिक जागरूक असेल आणि त्यानुसार आपल्या जीवनशैलीत बदल घडवेल. - शिक्षण आणि AI चा वापर:
वैयक्तिक शिक्षणासाठी AI चा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जाईल. शिक्षण अधिक वैयक्तिकृत आणि स्मार्ट होईल, जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार शिकायला मिळेल. - सोशल मीडियाची भूमिका:
Gen Z आणि Gen Alpha यांच्यासाठी सोशल मीडिया एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु Gen Beta साठी त्याची भूमिका आणखी विकसित होईल. नवीन पिढी सोशल मीडियाचा अधिक व्यावसायिक, वैयक्तिक विकासासाठी किंवा इको-सिस्टीम तयार करण्यासाठी वापर करेल.
काय आहे पिढ्यांचा कालावधी?
- Gen Z (1996-2010): डिजिटल क्रांतीला जवळून अनुभवणारी पिढी.
- Gen Alpha (2010-2024): सोशल मीडिया आणि स्मार्ट उपकरणांसोबत जन्मलेली पहिली पिढी.
- Gen Beta (2025-2039): कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान बदलाच्या प्रभावाखाली वाढणारी पिढी.
Gen Beta चे भविष्य
तंत्रज्ञान, स्मार्ट उपकरणं, AI, आणि वाढते शहरीकरण यांच्या माध्यमातून Gen Beta पिढी नवीन ट्रेंड्स निर्माण करेल. ही पिढी केवळ तंत्रज्ञानाची उपभोगकर्ता नसून त्याचा योग्य वापर करणारी आणि जगभरातील बदलांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाणारी असेल.
तुमच्या मतानुसार, Gen Beta कशी असावी? आम्हाला कळवा तुमचे विचार.



