हिंजवडी (ता. मुळशी) येथे टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे घडली. हिंजवडी फेज वन येथे ही दुर्घटना घडली असून, आयटी क्षेत्रातील व्योमा ग्राफिक्स कंपनीचे १२ कर्मचारी प्रवास करत होते.
प्रवासादरम्यान टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. चालक आणि काही कर्मचारी तत्काळ खाली उतरले, मात्र मागील दार उघडता न आल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. इतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडत असताना स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सध्या हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेने आयटी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
🔹 घटनास्थळ: हिंजवडी फेज वन, ता. मुळशी
🔹 मृत्यू: ४ जणांचा होरपळून मृत्यू
🔹 जखमी: इतर कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू



