साऊथ इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, सध्या सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण आहे? जर तुम्हाला वाटत असेल की रश्मिका मंदाना, नयनतारा किंवा समंथा रूथ प्रभू पहिल्या स्थानावर आहेत, तर तुम्ही चुकत आहात.
रश्मिका मंदाना नाही, मग कोण?
‘पुष्पा’ चित्रपटामुळे संपूर्ण देशभर चर्चेत आलेली रश्मिका मंदाना लोकप्रियतेच्या बाबतीत टॉपवर असली, तरी मानधनाच्या बाबतीत ती पहिल्या स्थानावर नाही.
नयनतारा आणि समंथा देखील पहिल्या स्थानावर नाहीत!
अनेकांना वाटेल की नयनतारा किंवा समंथा या दोन बड्या अभिनेत्रींपैकी एक सर्वाधिक मानधन घेते. मात्र, या दोघीही पहिल्या क्रमांकावर नाहीत.
ही अभिनेत्री घेते सर्वाधिक मानधन!
साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत साई पल्लवी पहिल्या क्रमांकावर आहे. ती एका चित्रपटासाठी तब्बल ३ ते १५ कोटी रुपये मानधन घेते.
साई पल्लवी का आहे इतकी खास?
साई पल्लवी ही तिच्या नॅचरल लुक आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ग्लॅमरस भूमिकांऐवजी ती साध्या आणि वास्तववादी पात्रांमध्ये अधिक दिसते. चित्रपटसृष्टीत असूनही ती नेहमी सोज्वळ आणि साध्या लूकमध्ये वावरते.
नयनतारा दुसऱ्या स्थानावर, अनुष्का तिसऱ्या
नयनतारा एका चित्रपटासाठी ३ ते १२ कोटी रुपये मानधन घेते. त्यामुळे ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या स्थानावर आहे ‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी, जिला एका चित्रपटासाठी ५ ते ७ कोटी रुपये मिळतात.
रश्मिका आणि समंथा चौथ्या-पाचव्या स्थानी
रश्मिका मंदाना एका चित्रपटासाठी ४ ते ८ कोटी रुपये मानधन घेते, तर समंथा रूथ प्रभूला ३ ते ८ कोटी रुपये मिळतात.
रणबीर कपूरसोबत साई पल्लवी झळकणार मोठ्या भूमिकेत!
साई पल्लवी लवकरच रणबीर कपूरसोबत ‘रामायण’ चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या भूमिकेसाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.



