आर्मी पब्लिक स्कूल दिघीचा विद्यार्थी आणि अरेना क्लब भोसरीचा खेळाडू असणाऱ्या समर्थ योगीराज शेलार याने आपल्या दमदार खेळाने दमदार कामगिरी केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत समर्थची ८ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याचबरोबर, गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या प्री-नॅशनल स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत त्याने राष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. गोवा येथील स्पर्धेतून त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
समर्थच्या सातत्यपूर्ण यशामागे ओम पोखरकर सर व अझहर सर यांचे मार्गदर्शन तसेच तो शिकत असलेल्या आर्मी पब्लिक स्कूलचे पाठबळ आहे.
या दुहेरी यशाबद्दल समर्थचे सर्व माध्यमांमधून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. त्याचसोबत विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेतही तो तितक्याच उत्साहाने चमक दाखवेल, अशा सर्वांकडून शुभेच्छाही व्यक्त होत आहेत.



