महाराष्ट्राच्या विधानसभेतील ‘लाडकी बहीण’ योजना आता राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरली आहे. निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात महिलांच्या खात्यात पैसे टाकून महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला. पण सरकार स्थापन झाल्यानंतर अर्जांची छाननी केली जाणार असल्याच्या बातम्या समोर येताच टीकेची झोड उठली आहे.
राऊतांचा सवाल:
ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी थेट सरकारवर निशाणा साधत विचारलं, “मतं विकत घ्यायची होती तेव्हा कोणते निकष लावले नाहीत, आता अचानक निकषांची गरज का वाटते?”
वाघ यांचा स्पष्टवक्तेपणा:
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी, “ज्या पुरुषांनी महिलांच्या नावाने लाभ घेतला आहे, त्यांची चौकशी होईल,” असे सांगत योजनेच्या पारदर्शकतेवर भर दिला.
आदिती तटकरे यांचा दिलासा:
माजी मंत्री आदिती तटकरेंनी या चर्चांवर पडदा टाकत स्पष्ट केलं की, “अर्जांची कोणतीही व्यापक छाननी होणार नाही. तक्रारी आल्यासच त्या प्रकरणात तपास केला जाईल.”
महिला केंद्रित या योजनेमुळे निवडणुकीत विजयाचा मोठा आधार मिळाला, पण आता योजनेच्या अंमलबजावणीवरून महायुती सरकारविरोधात विरोधकांनी कडवट भूमिका घेतली आहे.



