पुणे : मुळशी येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (SGIS) ने देशातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत ‘स्कु न्यूज’ मार्फत जयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड सोहळ्यात ‘प्रथम क्रमांकाची उद्योनमुख शाळा 2025’ हा सन्मान पटकावला आहे. जयपूर येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त श्री. विनायक भोसले यांनी प्रमुख अतिथी रवी संतलानी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी एसजीआयएसचे लकी सुराणा देखील उपस्थित होते.
नुकतीच सुरू झालेल्या या शाळेला जीवन कौशल्य शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण, सामुदायिक व सहयोगी उपक्रम, तसेच भविष्यातील शैक्षणिक गरजांची जाण ठेवून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देत असल्याबद्दल हा सन्मान प्राप्त झाला आहे.या प्रसंगी विश्वस्त विनायक भोसले म्हणाले, “चेअरमन संजय घोडावत यांची दूरदृष्टी, संचालिका सस्मिता मोहंती यांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या प्रयत्नामुळेच हा सन्मान मिळाला आहे.
अत्याधुनिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, शिक्षकांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, आणि जागतिक दर्जाचे शिक्षण ही आमची वैशिष्ट्ये आहेत.”या पुरस्काराबद्दल चेअरमन संजय घोडावत व सेक्रेटरी श्रेणीक घोडावत यांनी श्री. विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच प्राचार्या मिता शर्मा, शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि पालकांचेही कौतुक करून आभार मानले. या यशाबद्दल सर्व स्तरातून शाळेच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन होत असून, मुळशी परिसरातही या यशाचा मोठा गौरव केला जात आहे.



