भोर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
भोरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मांडेकरांच्या रॅलीस प्रारंभ झाला. या प्रसंगी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर, जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती बाबा कंधारे, माजी उपसभापती सारिका मांडेकर, माजी युवक नगरसेवक सुषमा निम्हण, अध्यक्ष सागर साखरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ हगवणे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा चंदाताई केदारी, केदार देशपांडे, कुणाल धुमाळ, राजेंद्र सोनवणे, पांडुरंग निगडे, कात्रज दूध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे, नगरसेवक प्रमोद निम्हण, श्रीकांत कदम, नंदूशेठ भोईर, गणपत जगताप, हरिदास कोकाटे, शिवाजी ढेबे, विक्रम बोडके, संग्राम निगडे, मुळशी तालुका युवक अध्यक्ष सुशील हगवणे, मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, माऊली साठे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी मांडेकर यांनी सांगितले की, “मी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. महायुतीची उमेदवारी मिळालेली असली तरी, महायुतीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मी भेट घेणार आहे. आम्ही एकत्रितपणे काम करू.



