गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर अखेर पृथ्वीवर काही दिवसात परतणार आहेत. या अंतराळवीरांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ना स्पेस क्राफ्ट-10 पाठवले आहे.हा स्पेस क्राफ्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) दाखल झाला असून तब्बल नऊ महिन्यांनंतर सुनिता विल्यम्स आणि बुच यांची पृथ्वीवरील सहकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट झाली आहे. आता येत्या आठवड्याभरात ते पृथ्वीवर परत येणार आहेत. या अभूतपूर्व मोहीमेच्या यशस्वी पूर्णतेसाठी संपूर्ण जग उत्सुक आहे.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवरती थाटात स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या या धाडसी मोहिमेने जागतिक पातळीवर पुन्हा एकदा अंतराळ संशोधनाच्या दिशेने नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत.येत्या काही दिवसांत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या पुनरागमनाची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल. संपूर्ण जग त्यांच्या या यशस्वी परतीसाठी उत्सुक आहे.



